गेल्या वर्षी 30 जूनच्या मध्यरात्री समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा नजीक पिंपळखुटा गावाजवळ नागपूर हून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसचा अपघात होऊन त्या बसला आग लागली होती. या आगीत जवळपास 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेला आज रात्री एक वाजता एक वर्ष पूर्ण झालं. त्यामुळे सिंदखेड राजा व पिंपळखुटा या गावातील नागरिकांनी रात्री दीड वाजताच्या सुमारास समृद्धी मार्गावरील अपघात स्थळी मृत प्रवाशांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी अपघातस्थळी भेट देऊन मृतकांना 25 लाख रुपयाची घोषणा केली होती ती रक्कम मृतकाच्या नातेवाईकांना अद्याप मिळाली नसल्याने आजही मृतकाचे नातेवाईक ओरड करतायेत.. अपघातातील मृतक यवतमाळ वाशीम व नागपूर जिल्ह्यातील होते .. समृद्धीवरील सर्वात मोठा भयावय तो अपघात झाला होता…
समृद्धी आजही मृत्युचा सापला बनत चालला आहे.. परवा अपघात झाला त्यात 6 जणांचा म्रुत्यु झाला होता..