गेल्या आठवड्याभरपासून राज्यात विविध जिल्ह्यात पोलीस भरती सुरु आहे.. ठिकठिकाणी भरतीसाठी हजारो उमेदवार उपस्थित झाले आहेत.. त्याचं प्रणाने बुलढाण्यात सुद्धा पोलीस भरती सुरु आहे.. ऐन पावसाळ्यात पोलीस भरती आल्याने मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना त्रास होत् आहे त्यामुओले बऱ्याच जिल्ह्यातील पोलीस भरती पुढे ढकलन्यात् आली आहे मात्र बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस भरती अखंडीत सुरु आहे.. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पावसाळा सुरु झाला आहे.. भरती साठी येणार्या उमेदवारांना मैदानी चाचणी साठी कुठलाही त्रास अडथळा होता कामा नये यासाठी नियोजन बद्ध कार्यक्रम आखला.. व मैदानावर ताडपत्री टाकून संपूर्ण ग्राउंड झाकल्या गेले.. पाऊस कितीही आला तरी मैदान सुरक्षित व कुठेही चिखल न होता उमेदवार मैदानी चाचणी देत आहे.. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस भरती अखंडीत सुरु आहे…तसेच बाहेरच्यात जिल्ह्यातून असंख्य उमेदवार भरतीत उतरले आहेत त्यांच्या राहण्याची सोय मोफत करण्यात आली आहे तर त्यांच्या दररोज नास्त्याची सुद्धा सोय पोलीस विभागा मार्फत करण्यात आली आहे.. आज उमेदवारांच्या पालक नातेवाईकासाठी सुद्धा नास्ता ची व्यवस्था करण्यात आली होती .. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी उमेदवारासाठी केलेली उत्तम व्यवस्था व भरती अखंडित घेत असल्याने नातेवाईक व भरती साठी आलेल्या उमेदवारांनी पोलीस विभागाचे समाधान व्यक्त केले आहे…