8.3 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्हा रुग्णालयाची दुरावस्था;अस्वच्छता व गुरांच्या मुक्त संचाराने रुग्णांना करावा लागतो त्रास सहन

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्वच्छता व डुकरांच्या मुक्त संचारामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा रुग्णभरती असलेल्या वार्डमध्ये डुक्कर आणि कुत्रे आराम करताना दिसत आहे. केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्र्यांच्याच जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या सामान्य रुग्णालयात हे भीषण वास्तव समोर आला आहे पाहुयात..आपण दृश्यात बघत असलेल्…. हे काही साधंसुध रुग्णालय नाही..तर हे आहे… केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्हा मुख्यालय असलेलं जिल्हा सामान्य रुग्णालय.. या रुग्णालयात आपण बघत असाल तर रुग्णांच्या अवतीभोवती चक्क डुकरांचा व कुत्र्यांचा अधिवास आहे. इतकंच काय तर रुग्णालय परिसरात इतकी अस्वच्छता आहे की, दुर्गंधीमुळे या रुग्णालयात रुग्णही यायला नकार देत आहेत. विशेष म्हणजे या रुग्णालयात पन्नास हून अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांची फौज आहे. अनेकदा तर रुग्ण भरती असलेल्या वार्डमध्ये व खोल्यांमध्ये चक्क डुक्कर आणि कुत्रे बेडवर आराम करताना दिसतात .मात्र याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक यांना विचारलं असता ते बोलण्यास तयार नाहीत . मात्र आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयाचे हे हाल असतील , तर इतर ठिकाणी काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी. सर्वत्र पसरलेला कचरा व त्यामुळे दुर्गंधी रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने रुग्णांना त्यामुळे अनेक विकार होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही..

Related Articles

ताज्या बातम्या