3 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

मलकापूर येथे हिट अँड रण अपघात..एका कारने पादचाऱ्यास उडविले..कारचालक फरार,अपघाताची घटना सिसिटीव्ही मध्ये कैद..

मलकापूर शहर परिसरात ‘हिट अँड रन’ अपघाताची घटना घडली. परप्रांतातील भरधाव वाहनाने पायी जाणाऱ्या इसमाला उडविल्याने एका इसमाचा करुण अंत झाला. या अपघाता ची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग ५३ वर हॉटेल यादगार नजीक ही भीषण दुर्घटना घडली.भरधाव चारचाकी वाहनाने जोरात धडक दिल्यावर अपघातग्रस्त वृद्ध इसम अक्षरशः फुटबॉल सारखा हवेत भिरकावला गेल्याचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ मध्ये दिसून येत आहे. धडक देणारी ‘कार’ गुजरात राज्यातील असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

मलकापूर तालुक्यातील कुंड बुद्रुक येथील रहिवासी तथा पोलिस पाटील नामदेव तुकाराम कवळे (५८) हे नेहमीप्रमाणे मलकापूरला येण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यांनी कुंड बुद्रुक फाट्यावरून महामार्ग ओलांडला. त्यानंतर हॉटेल यादगा रनजीक वाहन पकडण्यासाठी ते पायी जात होते. त्यावेळी मुंबई वरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव (जीजे-१५, बिएफ-२५६४) चारचाकी वाहनाने कवळे यांना वेगाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ते हवेत अक्षरशः भिरकावल्या जाऊन दूर अंतरावर जाऊन जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्यात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जखमीस मलकापूर येथील उपजिल्ह रुग्णाल्यात भरती केले असता ते मृत घोषित करण्यात आले.. कार चालकाचा मलकापूर पोलीस शोध घेत आहे..

Related Articles

ताज्या बातम्या