रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील चवदार तळ्यावर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनाला ९७ वर्ष पूर्ण होत आहे. या सत्याग्रहाच्या आठवणीला उजाळा देत आमदार संजय गायकवाड यांनी तळ्याच्या पुनरुज्जीवनासाठी आज २ जुलैच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली.मतदार संघातील विविध प्रश्नांवर लक्षवेधी उपस्थित करताना आमदार गायकवाड म्हणाले, आज रोजी चवदार तळ्याच्या आंदोलनाला ९७ वर्ष पूर्ण होत आहे. परंतु सदर तळ्याचा प्रस्ताव शासन दरबारी प्रस्तावित आहे. त्याला मान्यता देणार आहात का? तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी तलाव व धरणांमध्ये एसटीपी बसवण्यात येतो त्या प्रकारची पद्धत साकारणार आहेत का ? किंवा तसे करता येत नसल्यास इजराइलच्या धर्तीवर जसे समुद्राचे पाणी गोड करण्याची प्रक्रिया केली जाते तशी प्रक्रिया राबवणार का? असे अत्यंत महत्त्वाचे तीन प्रश्न आ. गायकवाड यांनी उपस्थित केले. चवदार तळ्याच्या सौंदर्य करण्यासाठी विशेष अनुदान देण्यासाठी राज्य सरकार योजना राबवणार का असेही असेही आ. गायकवाड यांनी विचारले. २०२७ मध्ये या पवित्र चवदार तळ्याला १०० वर्ष पूर्ण होत असून त्या अनुषंगाने शतक महोत्सवी वर्ष साजरा करण्यात यावे असेही मत मांडण्यात आले. दरम्यान आ. गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, ऐतिहासिक चवदार तळ्यासाठी सुरुवातीला एक कोटी ३७; लाख रुपयांचे अनुदान देऊन तेथील कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. शिवाय शासन प्रस्ताव लवकरात लवकर पाठवण्यात येईल. व त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील तसेच अनुदान मंजूर झाल्यानंतर राहिलेल्या कामांना सुरुवात देखील करणार असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.