-3.9 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

*विधानसभेचे अनेकांना लागले डोहाळे… मतदार नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे चित्र..*

  1. *विधानसभेचे अनेकांना लागले डोहाळे… मतदार नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे चित्र..*

नुकत्याच लोकसभा निवडणुका संपल्या आहेत.. आता बाकीच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे सुतोवाच निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.. आता दोन महिन्यानंतर लागलीच विधानसभा निवडणुका जाहीर केल्या गेल्याचे संकेत सुद्धा देण्यात आले आहे.. त्यामुळे राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात अनेक नवीन चेहेऱ्यांना संधी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत सुद्धा आहे.. बुलढाणा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकी साठी अनेकजण डोक्याला बाशिंग बांधून तयार आहेत काहिनी तर स्वतः ची उमेदवारी सुद्धा घोषित केली आहे.. जर मला विधानसभेच तिकीट दिल तर संधीच सोन जरून दाखवीन असे आश्वासने पक्षाच्या मेळाव्यात देण्यात आले आहेत… जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदार संघ आहेत.. या मतदार संघात तीन भाजप, शिंदे गट शिवसेना दोन, राष्ट्रवादी अजित पवार एक काँग्रेस एक अस तुल्यबळ आहे.. राज्यातील घडामोडी रोज बदलत आहेत.. विविध योजनाचे प्रलोभने दाखविल्या जात आहे.. सर्वोतोपरी प्रयत्न राज्य सरकार करीत आहे .पण राज्यातील जनता महागई, बेरोजगारी, शेतकरी विषयी चुकीचे धोरण, क्राईम वाढ, याला जनता कंटाळली आहे त्यामुळे सध्याच्या विद्यमान आमदारांना वैतागली आहे.. आता जनता हुशार झाली आहे त्याचा प्रत्यय लोकसभेत सर्वांना आलाय.. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात नवीन चेहऱ्यांना संधी प्राप्त होताना दिसत आहे..

Related Articles

ताज्या बातम्या