*जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा..धरणे कोरडेच, पाणी टंचाई च संकट वाढले..*
*खडकपूर्णा कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना कार्यानवीत करावी..नागरिकाची मागणी*
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व छोटे मोठे प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला मात्र दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पाणी समस्या वाढली आहे.. आजही जिल्ह्यात 80 टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.. त्यात जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहराला सुद्धा आजमितीस 8 दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे.. बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात केवळ 17 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे त्यामुळे पाणी टंचाई च संकट ओढवलं आहे..
गेल्या 10 वर्षांपूर्वी बुलढाणा शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती खडकपूर्णा धरणावरून पाणी बुलढाणा शहराला आणण्यात येणार असल्याची योजना मंजूर होऊन अंतिम टप्प्यात आली आहे.. मात्र हे काम संथ गतीने सुरु असल्याने बुलढाणेशहरवासियांना आता टंचाई ला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे..
जिल्हा प्रशासन याकडे पाहिजे तसे लक्ष द्यायला तयार नाही.. पाहिजे तसा पाउस् न झाल्याने पैनगंगा नदीला पूर न गेल्याने येळगाव धरणात पाणी आलेच नाही एक महिना उलटून गेलाय. आता पुढे पाऊस होतो की नाही याकडे जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.. यासाठी पर्यायी व्यवस्था तातडीने खडकपूर्ण कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना कार्यानवीत करावी अशी मागणी शहर वासीय करीत आहेत