रामदास कहाळे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर
संभाजीनगर मध्ये उद्या पुरस्काराचे होणार वितरण
सिंदखेड राजा तालुक्यातील आडगाव राजा येथील जेष्ठ पत्रकार रामदास कहाळे
यांना निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवा भावी संस्था संभाजी नगर च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण उद्या संभाजीनगर येथे होणार आहे
आंबेडकरी चळवळीचे विश्वासू , निष्पृह, निर्भीड आघाडीचे वृतपत्र दैनिक- “निळे प्रतीक” च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त १७ जुलै २०२४ बुधवार रोजी दुपारी ०१: ००वाजता, मौलाना आझाद सभागृह टीव्ही सेंटर येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले असून या सोहळ्यात आपण आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, आपल्याला पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवा भावी संस्थे चे अध्यक्ष तथा दैनिक निळे प्रतीक चे मुख्य संपादक रतनकुमार साळवे यांनी दिलेल्या पत्रात दिली आहे.
रामदास कहाळे हे
गेल्या 17 वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून पत्रकारिता करत असताना आडगाव राजा या गावचे सरपंच उपसरपंच पदभार सांभाळला आहे .अडगावराजा गावाला आदर्श गाव बनविण्यासाठी त्यांचा शिहांचा वाटा आहे राजे लखुजीराव जाधव यांचे गाव जिल्ह्याच्या नकाशावर आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असून यामुळेच गावाला जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे त्याचा बरोबर पत्रकारिता करत असताना सामाजिक चळवळी साठी प्राधान्य देत पत्रकारिता केली आहे त्यामुळेच सामजिक क्षेत्रात त्यांचे संबंध ही जमेची बाजू आहे. पत्रकारिते च्या माध्यमातून त्यांनी लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे. सामाजिक व राजकीय वर्तुळात त्यांचं नाव आहे .त्यांनी आतापर्यंत. वृतरत्न सम्राट, सकाळ , पुण्यनगरी, लोकमत ,देशोन्नती, लोकमंथन, मेहकर टाइम्स , आदी वृत्तपत्रात काम केले आहे पत्रकारिता करत असताना सामाजिक चळवळ जोपासली आहे पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक चळवळीला प्राधान्य देत सामाजिक समस्या अन्याय अत्याचाराला प्राधान्य देण्याचे काम त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केले आहे त्यांना निळे प्रतीक सामाजिक बहुउद्देशीय संस्था च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण उद्या संभाजीनगर येथे होणार आहे