💥💥 *Breaking News*💥💥
*पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुलढाणा वन मिशनचे संदीप शेळके यांनी बांधले शिवबंधन.*
बुलडाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह सामाजिक, राजकीय, आरोग्य व महिला बचत गटात आपले नावलौकिक करणारे वन मिशनचे संदीप शेळके* यांनी आज दिनांक २३//७/२४ रोजी मातोश्री मुंबई येथे उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते तसेच सचिव मा खा विनायक राऊत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, व जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटीका सौ चंदा ताई बढे , उप जिल्हा प्रमुख सुनील घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, किसान सेना उप जिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, उप तालुका प्रमुख विजय ईतवारे यांची उपस्थिती होती.