शिवसेना नेते डॉ.मधुसूदन सावळे यांच्या तर्फे दोन दिवस आधीच झडकले शिवसेना उ.बा.ठा पक्षप्रमुख तथा मा.मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर..!
दि.२७ जुलै रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा मा.मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे.परंतु दि.२५ जुलै रोजी संपूर्ण मोताळा तालुक्यात मोठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे.विविध गावामध्ये वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर लावले आहे जसे की धामणगाव बढे,पिंपळगाव देवी,लालमाती फाटा ,को-हाळा,रोहिनखेड, वाघजाळ, मोताळा,कोथळी,शेलापूर इ.ठिकाणी बॅनर बाजी करून शिवसेना नेते डॉ.मधुसूदन सावळे यांच्या लावलेल्या या बॅनर बाजी करून संपूर्ण मतदारांचे लक्ष वेधले आहे.यावरून असे स्पष्ट होते ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील याची खात्री आता मतदारांमध्ये चांगलीच रंगली आहे..कारण त्यांनी जे बॅनर लावले आहे त्या प्रत्येक बॅनर वर नावाच्या खाली पद न टाकता त्यांनी शिवसेना बुलढाणा विधानसभा मतदारसंघ असाच उल्लेख केला आहे यावरून हे सिद्ध होते की ते निवडणुकीच्या रिंगणात असतीलच..!