*बुलढाण्यात विविध कार्यक्रमानी भव्य कारगिल विजय दिवस संपन्न*
बुलढाणा अर्बन परिवार, सहकार विद्या मंदिर, सैनिक कल्याण कार्यालय, यश सिद्धी सैनिक सेवा संघ, प्रहार सैनिक संघटना व बुलढाणा जिल्ह्यातील समस्त सैनिक समन्व्य समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, कर्णल सुहास जतकर साहेब मा, संचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र यांचे संकल्पनेतून, आणि मा, राधेश्याम जी चांडक यांच्या भव्य आयोजनात 25वा कारगिल विजय दिवस संपन्न झाला,
कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारक कानडे उद्यान या ठिकाणी शहीदाना पुष्प चक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, यावेळी, शौर्य चक्र विजेते रमेश बाहेकर, सेना मेडल विजेते रामदास वाघ यांचे सुपुत्र सुरेश वाघ,
डॉ सुकेश झवर साहेब बुलढाणा अर्बन चे संचालक,
कर्णल सुहास जतकर साहेब मा, संचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य
डॉ रुपाली सरोदे मॅडम, स्कवॉर्डन लीडर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बुलढाणा जिल्हा
मा, शेलार साहेब अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्हा
तहसीलदार साहेब
यांनी पुष्पचक्र अर्पण केले,
यानंतर सैन्य पराक्रम पदक विजेत्यांचा शहरातून शोभा यात्रा व सैनिक गौरव बाईक रॅली काढून सम्मान करण्यात आला,रॅली बुलढाणा शहराच्या मुख्य रस्त्यानी मार्गक्रमण करत सहकार विद्या मंदिर पर्यंत संपन्न झाली, रॅली ला उत्स्फूर्त प्रतिसाद होता,
रॅली मध्ये यश सिद्धी सैनिक सेवा संघा चे सैनिक विशेष आणि आकर्षक ड्रेस कोड मध्ये होते तर विविध संघटना चे सैनिक,तसेच बुलढाणा अर्बन चे कर्मचारी वृंद मोठया प्रमाणात सहभागी झाले होते सैनिक गौरव रॅली अनिल डोंगरदिवे यांनी यशस्वी पणे पार पडली,
या नंतर सहकार विद्या मंदिर येथे, कारगिल युद्धात सहभागी मिग 21,एअर फायटर, टॅंक, आणि अँकर याला मा, पोलीस अधीक्षक सुनील काढासने साहेब, अप्पर जिल्हा पुलिस अधीक्षक महामुनी साहेब,
आमदार संजू भाऊ गायकवाड,
आमदार धीरज भाऊ लिंगाडे,
आदरणीय भाईजी राध्ये शाम चांडक तसेंच मा कोमल झंवर मॅडम यांनी पुष्प चक्र अर्पित केले यावेळी सूत्रसंचालन अनिल डोंगरदिवे यांनी केले,
कार्यक्रमाच्या मुख्य टप्प्यात सहकार विद्या मंदिर च्या सभागृहात मान्यवरणाच्या हस्ते शस्त्र प्रदर्शनी चे उदघाटन व पाहणी करणायत आली त्या नंतर मंच्या वरील कार्यक्रमाची सुरवात सहकार विद्या मंदिर च्या विदयार्थ्यांनी नी बँड च्या धून वर वंदेमातरम ने केली त्या नंतर मानव्यवरांचा सत्कार करण्यात आला व मानव्यरांच्या हस्ते शहीद परिवारातील वीर नारी वीर पत्नी ना पुषगुच्छ साडी, सम्मान चिन्ह देऊन सम्मान करण्यात आला सम्मान करण्यात आला,
त्या नंतर कार्यक्रमाचे प्रसत्विक पर डॉ सुकेश झवर यांनी आपले मनोगतात कारगिल युद्धा ची विस्तृरती माहिती दिली,
यानंतर, आमदार संजय गायकवाड यांनी सैनिकांसाठी केललं कार्य विषद केलं,
आमदार धीरज लिंगाडे यांनी सैनिक की शिस्त, आणि प्रशिक्षण प्रत्येकाला अनिवार्य करणे काळाची गरज असल्याचे आपल्या भाषणातून एक सुचक सल्ला दिल्ला,व अग्निवीर ही अयशस्वी पद्धत बंद करण्याचे आश्वस्त केले,
कार्यक्रमात अत्यन्त प्रबोधनत्मक आणि अभ्यास पूर्ण, गझल, आणि शायरी च्या माध्यमातून सेंवेदनशील मुद्द्यावर प्रकाश टाकत पोलीस अधीक्षक सुनील खडसणे साहेबांनी आपल्या रंगतदार आणि गंभीर असे आपल्या मनोगतातने विचारांनी आणि ज्ञानेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, कार्यक्रमाचे बहारदार आणि नियंत्रित सूत्रसंचालन कर्णल सुहास जतकर साहेब यांनी केले तर कार्यक्रम चे समर्पक आभार प्रदर्शन अनिल डोंगरदिवे यांनी केले शेवटी कार्यक्रमाची पोलीस बँड च्या सुमधुर राष्ट्रगीत च्या धुणेवर सांगता झाली, कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सुबेदार मेजर शेळके
सुबेदार मेजर नेमाने
सुबेदार मेजर सुरेश खंडारे
गुलाबमिसाळ
प्राचार्य गवारे सर
मा दलाल सर
तर ncc प्रशिक्षक राजू हिवाळे सर यांनी आपल्या ncc कॅडेट सह परिश्रम घेतले,
Ncc कॅडेट नी अत्यन्त उत्कृष्ट पायलेटिंग करून सगळ्यांना आकर्षित केले, उपस्थितांसाठी सहकार विद्या मंदिर च्या वतीने भोजनाची व्यवस्था केलीली होती …