बुलढाणा
आ संजय गायकवाड यांच्या मुलाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा..
बुलढाणा विधानसभेतून लाखो जनतेनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी..
युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उसळला प्रचंड जनसागर…!
आ गायकवाड यांनी तलवारीने कापला केक, तलवारीनेचे मृत्युंजय ला भरवला केक.. सर्वत्र चर्चा..
१५ ऑगस्ट २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघातील हजारोच्या संख्येने माता-भगिनी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी बुलढाणा येथे आलेले होते…!
युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा अविस्मरणीय,आगळावेगळा सोहळा म्हणून साजरा करण्यात आला..! भव्य स्टेज उभारण्यात आला होता, शहराच्या मुख्य रस्त्यावर हा सोहळा पार पडला.. आ गायकवाड यांनी उपस्थिताना आपल्या मनोगतातून बुधना विधानसभेत केलेले विकास कामाचा पाढा वाचून दाखवीला व प्रस्तावीत कामाची यादी वाचून दाखविली… जाती धर्म विरहित काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.. स्टेजवर भला मोठा केक आणण्यात आला होता आ गायकवाड यांचे कुटुंब उपस्थित होते.. तो केक आ संजय गायकवाड यांनी तलवारीने कापला व बर्थडे बॉय सुपुत्र मृत्युंजय गायकवाड याल तो केक तलवारीच्या साहायाने भरविण्यात आला तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना तलवारीनेच केक भरविण्यात आला…
असा वाढदिवसा बुलढण्यात सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची पहिलीच घटना असल्याची सर्वत्र चर्चा होती..
दरम्यान जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला बुलढाणा शहरातील महात्मा फुले प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले..!
तसेच अभंग पुनर्वसन संस्था येथे मूकबधिर अपंग विद्यार्थ्यांना भोजनाचे वाटप करण्यात आले…!
दिव्य-सेवाप्रकल्प तसेच सेवासंकल्प येथे निराधार निराश्रीत लोकांना भोजन वाटप करण्यात आले…!
शहरातील कारंजा चौक येथे दुर्गामाता मंदिरामध्ये भव्य महाआरती युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते संपन्न झाली…