बुलढाणा
जिजाऊच्या जन्मस्थळ सिंदखेडराजा तालुक्यात चार शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरण…
काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी दिली वर्दडी शाळेला भेट..
हेडमास्तर यांच्याशी केली सविस्तर चर्चा..
आरोपी शिक्षकाला केले निलंबीत, पाच दिवसाची पोलीस कोठंडी..
देशात महिला सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले असल्याने महिलावर सातत्याने अत्याचार केले जात आहे, कोलकत्ता व बदलापूर प्रकरणानंतर बुलढाणा जिल्ह्यातील जिजाऊ जन्म स्थळ असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी येथील जिल्हा परिषदेच्या चौथीतील चार विद्यार्थिनीवर वर्ग शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली.. पोलिसांनी तात्काल दखल घेत विविध कळमन्व्ये गुन्हे दाखल करीत आरोपी शिक्षकाला अटक केली.. जिल्हा परिषदेने शिक्षक खुशलरावं उगले याला निलंबीत केले आहे … तसेच पोलिसांनी शिक्षकाला न्यायाल्यासमोर् उभे केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे..
वर्दडी गाव या घटनेने चर्चेत आले.. याचं गावात काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी भेट दिली व त्या जिल्हा परिषद शाळेत जाऊन हेडमाडतर यांच्यातशी सविस्तर चर्चा केली…
चार मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी शिक्षक खुशालरावं उगले यांना पाठीशी घालु नका त्यांना शिक्षा झालीच पाहिजे… असे जयश्री शेळके यांनी सूचना केल्या व शाळेतील सर्व विद्यार्थिनीशी संवाद साधून माहिती घ्या .. चिमुकल्याच्या मनावरील दडपण दूर करण्याचं काम तुमचं असल्याचे शेळके यांनी हेडमास्तर यांना सांगितले…
वर्दडी येथील शाळा वर्ग 1 ते 8 असून पटसंख्या 215 आहे त्यात 100 मुली आहेत मात्र आजपर्यंत त्या जिल्हा परिषद शाळेत एकही महिला शिक्षिका कार्यरत नाही हे विशेष…