बुलढाणा
दिसतील त्या ठिकाणी आमदारांना बदडून काढू – डिक्कर*
शिव जन स्वराज्य यात्रेला शेगावातून सुरुवात…
यात्रेत शेतकरी शेतमजुरांनी सहभागी व् आवाहन्
कापुस-सोयाबिन भाववाढ कर्जमाफी व पिकविमा सह विविध प्रश्नांवर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात आज ४ सप्टेंबर पासून श्री क्षेत्र नागझरी येथुन शिव जनस्वराज्य यात्रेचा प्रारंभ करण्यात आला आहे. ही यात्रा 16 दिवसांमध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील 191 गावांचा दौरा करून शेतकऱ्यांची जनजागृती करणार आहे.
शेतकरी,शेतमजूर,महिला बचत गट, व युवकांच्या प्रश्नावर आक्रमक लढणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी पुन्हा सरकारला आवाहन करित आज बुधवार ४ सप्टेंबर २०२४ रोजी शेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नागझरी येथुन शिव जनस्वराज्य यात्रेला सुरुवात करीत त सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासंदर्भात इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हि जनस्वराज्य यात्रा १६ दिवसात १९१ गावात जाणार असुन कापुस सोयाबीन भाववाढ कर्जमाफी व पिकविमा सह विविध मागण्यांबाबत माजी खासदार राजु शेट्टी यांच्या उपस्थित लाखो शेतकऱ्यांच्या संख्येने शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी संग्रामपूर तहसिलच्या मैदानावर यात्रा धडकणार आहे. सोयाबीन भाववाढ कर्जमाफी व पिकविमा सह विविध प्रश्नांवर सरकारने निर्णायक भूमिका न घेतल्यास दि.२० सप्टेंबर च्या संग्रामपुरच्या महामेळाव्यात सरकार विरोधात क्रांतीचा नवा संग्राम होणार आहे.
२० तारखे पर्यंत शेतकऱ्यांना मदत झाली नाही तर नवा संग्राम पाहावयास मिळेल. यामध्ये सत्तेमधील आमदारांना राज्यात फिरू देणार नाही. शिवाय दिसेल त्या ठिकाणी स्वाभिनीचे कार्यकर्ते बदडून काढतील असा गंभीर इशारा प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे.