*शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब पाटील यांनी दिला जाहीर पाठिंबा..*
सोयाबीन कापूस दरवाढ, शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा, घरकुलाचे हप्ते वेळेवर मिळावेत अतिवृष्टी व ढगफुटी मुळे झालेले शेतकऱ्याचे नुकसान याची तात्काळ भरपाई मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब पाटील यांनी काठी घोंगड घेऊन तहसीलदार मेहकर यांना निवेदन दिले आहे त्याचबरोबर रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनाला सुद्धा भैय्यासाहेब पाटील यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे कापूस व सोयाबीन यांना अतिशय कमी भाव आहेत यामुळे शेतकरी हातबल होऊन आत्महत्या करण्याकडे वळत आहेत पिक विमा ही शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही त्याचबरोबर घरकुलाची हप्ते सुद्धा वेळेवर मिळत नसल्याने अनेक घरकुल अर्धवट आहेत अतिवृष्टी व ढगफुटीमुळे गेल्या काही दिवसात मेहकर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात भयंकर नुकसान झाले आहे शेतकरी हातबल झाले आहेत यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला भैय्यासाहेब पाटील यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने पाठिंबा देण्यासाठी तहसीलदार मेहकर यांना आज निवेदन दिले आहे यावेळी भैय्यासाहेब पाटील म्हणाले की जर शेतकऱ्यांच्या मागण्या वेळेवर सुटल्या नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला..