11.6 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img

आमदार नितेश राणेंच्या विरोधात बुलढाण्यात मुस्लिम समाजाचा विराट आक्रोश मोर्चा.. मोर्च्यात आमदार नितेश राणेच्या फोटोला जोडे मारून जाळून केला निषेध… नितेश राणेंना अटक करून सभांवर बंदी आणण्याची मागणी…

बुलढाणा

आमदार नितेश राणेंच्या विरोधात बुलढाण्यात मुस्लिम समाजाचा विराट आक्रोश मोर्चा..

मोर्च्यात आमदार नितेश राणेच्या फोटोला जोडे मारून जाळून केला निषेध…

नितेश राणेंना अटक करून सभांवर बंदी आणण्याची मागणी…

भाजपचे आमदार नितेश राणेंनी मुस्लिम समाजाच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्य विधानाच्या विरोधात आज बुलढाण्यात मुस्लिम समाजाच्या वतीने विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या आक्रोश मोर्चात मोठ्या प्रमाणात काळे झेंडे हातात घेवुन मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.या मोर्चात आमदार नितेश राणे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून नितेश राणे यांच्या फोटोला जोडे मारून जाण्यात आले.देशाची एकात्मता खंडित करून दंगल घडविण्याचा प्रयास करणाऱ्या नितेश राणेंना त्वरीत अटक करावी. हिंदू मुस्लिम दंगल घडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांच्या सभा व मोर्चांना परवानगी नाकारणे.पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणे, सामाजिक तेढ निर्माण करने.दंगल घडविण्याचे षडयंत्र रचने. पवित्र श्रद्धास्थान असलेल्या मज्जिदीमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी देणे प्रकरणी बुलढाणा शहर पोस्टेला नियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेशित करणे. या प्रमुख मागण्या जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना करण्यात आले.सदर मोर्चा इंदिरा नगर येथून काढून बस स्टँड,जयस्तंभ चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला या मोर्च्यात हजारोंच्या संख्याने मुस्लिम समाजातील युवक व नागरिक उपस्थित होते..

3) हर्षवर्धन सपकाळ,माजी आमदार,काँग्रेस
4) सतीश रोठे,अध्यक्ष आजाद हिंद संघटना

Related Articles

ताज्या बातम्या