4.6 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

पोलीस अधिकारी व अमंलदार यांचा मा.ना.श्री. मकरंद पाटील, पालकमंत्री, बुलढाणा जिल्हा व पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवुन केला गुणगौरव

बुलढाणा

पोलीस अधिकारी व अमंलदार यांचा मा.ना.श्री. मकरंद पाटील, पालकमंत्री, बुलढाणा जिल्हा व पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवुन केला गुणगौरव

पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथे 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी बुलढाणा जिल्हयातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी जिल्हयातील अत्यंत क्लिष्ट दरोडा, खुन, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी सारख्या गुन्ह्यांची उकल करुन, आरोपी शोध घेवुन एकूण 21 तोळे सोने, 21 किलो चांदी, नगदी रोख सह 42 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच गांज्या (अमंली पदार्थ) लागवड केलेल्या शेतावर छापा टाकुन गांजा (अंमली पदार्थ ) किंमती 4,51,00000/-रुपयाचा मुददेमाल जप्त केला. सार्वत्रिक विधानसभा निवडणुक 2024 हि निःपक्ष व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरीता आदर्श आचार संहिते दरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या उददेशाने बाळगलेली नगदी रक्कम जप्त केली. साऊथ एशिया अॅथलेटिक्स मध्ये धावण्याचे स्पर्धेत मिळालेले पदक आणी श्री. गणेश उत्सव, दुर्गा उत्सवा दरम्यान केलेल्या उत्कृष्ठ कार्यवाही व कामगीरी करीता मा.ना.श्री. मकरंद पाटील सा, पालकमंत्री, बुलढाणा जिल्हा यांचे हस्ते पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथील कवायत मैदानावर श्री. अशोक लांडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा, श्री. श्रीकांत निचळ, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. जळगांव जामोद, श्री. विकास तिडके, राखीव पोलीस निरीक्षक, पो.मु. बुलढाणा, पोहेकॉ शरद गिरी, स्था.गु.शा, बुलढाणा, पोहेकॉ राजु आडवे, तांत्रिक विश्लेषण विभाग, बुलढाणा यांना प्रशस्तीपत्र देवुन गुण गौरव करण्यात आला आहे. त्यावेळी श्री. किरण पाटील, जिल्हाधिकारी, बुलढाणा, तसेच इतर अधिकारी व अमंलदार तसेच नागरीक हजर होते.

पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा येथे श्री. विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचे हस्ते पोलीस अधिकारी श्री. रवि राठोड, प्रभारी पो. उपअधी., (गृह) बुलढाणा, पोनि. श्री. सुनिल अंबुलकर, जिल्हा विशेष शाखा, बुलढाणा, पोनि. श्री. रामकृष्ण पवार, पो स्टे खामगांव शहर, पोनि. श्री. गणेश गिरी, पो.स्टे. मलकापुर शहर, पो.नि.श्री. संतोष महल्ले, पो स्टे. देऊळगांव राजा, पो.नि.श्री. संग्राम पाटील, पो.स्टे. चिखली, पो.नि.श्री. नरेंद्र ठाकरे, पो.स्टे. बुलढाणा शहर, पोनि. ब्रम्हदेव शेळके, पो.स्टे. सिंदखेड राजा, पोनि दिनकर गावीत, बिनतारी संदेश विभाग बुलढाणा, सपोनि आशिष रोही, पोउपनि. प्रताप बाजड, पोउपनि सचिन कानडे, स्था.गु.शा. बुलढाणा, सपोनि दिपक ढोमणे, वाचक शाखा, बुलढाणा, सपोनि श्रीकांत इंगोले, वाचक शाखा, बुलढाणा, सपोनि विनोद नरवाडे, पो स्टे किनगांव राजा, पोउपनि पंकज सपकाळे, पो.स्टे. जळगांव जामोद, पोउपनि बालाजी सानप, पोस्टे, सिंदखेड राजा, तसेच पोलीस अमंलदार पोहेकॉ शरद गिरी, पोहेकॉ पुरुषोत्तम आघाव, पोहेका दिपक लेकुरवाळे, पोहेकों गणेश पाटील, पोहेकॉ शेख चांद, पोना. युवराज राठोड, संजय भुजबळ, पोकों गजानन गोरले, दिपक वायाळ, मंगेश सनगाळे, विजय सोनोने, मपोकों आशा मोरे, सर्व नेमणुक स्था.गु.शा. बुलढाणा, पोकॉ पोकॉ. कैलास ठोंबरे, पोकों ऋषीकेश खंडेराव, तांत्रिक वि.विभाग, बुलढाणा, पोकों विकास राऊत, पोस्टे सिंदखेड राजा, पोकॉ. राम धामोडे, पोकॉ. अंकुश गुरुदेव, पो.स्टे. खामगांव शहर, पोहेकॉ./463 प्रसाद जोशी, जिल्हा विशेष शाखा-बुलढाणा यांना प्रशस्तीपत्र देवुन त्यांचा गुण गौरव करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाला श्री.बी.बी. महामुनी, अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा तसेच इतर पोलीस अधिकारी व अमंलदार उपस्थित होते. पोलीस अधिकारी व अमंलदार यांचा प्रशस्तीपत्र देवुन केलेल्या गुणगौरवा मुळे पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे मध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या