8.3 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img

अजित पर्व अभियानाव्दारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार – सुरज  चव्हान  * येणाऱ्या काळात जिल्ह्यात जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविणार जिल्हाध्यक्ष अॅड. काझी –

अजित पर्व अभियानाव्दारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार – सुरज  चव्हान 

* येणाऱ्या काळात जिल्ह्यात जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविणार जिल्हाध्यक्ष अॅड. काझी –

स्थानिक स्वराज्य संस्थेवर बुलडाणा (प्रतिनिधी)

अजित पर्व हे अभियाला सुरुवात झाली असुन आज ७ फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश करीत जिजाऊ माँ साहेब यांचे माहेर असलेल्या सिंदखेडराजा येथे भेट देत जिजाऊंचे दर्शन घेतले. पुढे देऊळगाव राजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गट) चे आयोजित कार्यक्रमात युवक वर्गाला मार्गदर्शन करतांना चव्हाण यांनी युवकांना राजकारणात येण्याचे असेल अश्या युवकांना मोलाचे संदेश देत सांगितले की, युवक वर्गाने राजकारणात येऊन समाजसेवा करावी, असे बोलून त्यांनी अजित पर्व अभियानाव्दारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा) ला बळकटी मिळवून देणार असल्याचे त्यांनी आज पत्रकार परिषदेत पत्रकारांशी चर्चा करतांना सांगितले.

स्थानिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद आज ७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनिष बोरकर, पदाधिकारी यांची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेत अॅड. नाझेर काझी यांना सिंदखेडराजा पुरतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे का अशा प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी उत्तर देतांना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका सदस्य आहे. यावरून आपणाला दिसून येईल राष्ट्रवादीच्याकाँग्रेस पक्ष जिल्हाभरात आहे. तसेच येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद, पंचायत समितीत पक्षाला मजबुत करु, असेही सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवकचे जिल्हाध्यक्ष मनिष बोरकर यांनी पत्रकार परिषदेची विस्तृति माहिती देत उपस्थितांचे परिचय करून दिले.

Related Articles

ताज्या बातम्या