मुघल सम्राट औरंगजेबाला धूळ चारणारे महापराक्रमी शहाजीराजे होते.
ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील.
- शहाजीराजे भोसले जयंती निमित्त चर्चासत्र संपन्न.
शहाजीराजे भोसले स्वराज्याचे संकल्पक असून स्वराज्यासाठी असंख्य यातना आणि दुःख सहन करणारा महाप्रतापी राजा म्हणून शहाजीराजे इतिहासात अजरामर झाले. आदिलशहाची मनसुबदारी करून 300 लढाया,युद्ध जिंकणारा आणि त्यावेळी मुघल सम्राट औरंगजेबाला धूळ चारणारा महापराक्रमी आदिलशहाचे सरदार म्हणून शहाजीराजे भोसले यांचा पराक्रम स्वराज्यासाठी प्रेरणादायी ठरला. असे मत शिवव्याख्याते ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी व्यक्त केले.
छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा जिल्हा आणि शिव विचारावर कार्य करणाऱ्या सामाजिक संघटनाच्या संयुक्त विद्यमानाने चर्चासत्राचे आयोजन 18 मार्चला सायंकाळी बुलढाण्यात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवव्याख्याते ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. यावेळी शिवविचार पिठावर ज्येष्ठ विचारवंत सुभाष भागीले, संत रोहिदास महामंडळाचे सचिव इंजि.शिवाजी जोहरे,उत्सव समितीचे विशाल राणे, योगेश तायडे, नितीन गवई,दिलीप सोनुने, संजय येंडोले,सुरेखा निकाळजे आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे भोसले यांना सामूहिक मल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शहाजीराजे भोसले आणि स्वराज्य या विषयावर चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली.
_____
चर्चासत्रातील सूर.
राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय,संभाजीराजे यांनी स्वराज्याचा कळस रचला तर स्वराज्याचा महामेरू म्हणून शहाजीराजे भोसले यांनी सर्वस्व पणाला लावले. छत्रपती शिवराय, संभाजी राजे शहाजीराजांच्या संस्काराच्या कुशीतून स्वराज्याची संकल्पना पूर्णत्वास नेऊ शकले. त्यामुळेच स्वराज्य आजही जगाला आदर्श ठरले. असा एकंदरीत सूर मान्यवरांच्या चर्चासत्रातून समोर आला. प्रास्ताविक सुरेखा निकाळजे यांनी तर आभार प्रदर्शन आशाताई गायकवाड यांनी व्यक्त केले.
____
चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा जिल्हा, रमाई ब्रिगेड, मातृतीर्थ रणरागिनी संघटना, आझाद हिंद महिला संघटना, किसान ब्रिगेड, झाशी राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड, आझाद हिंद शेतकरी संघटना, अल्पसंख्यांक पिचळावर्ग संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
गर्जा महाराष्ट्र पोवाडा आणि राष्ट्रगीताने शहाजीराजेना मानवंदना देत चर्चासत्राचा समारोप करण्यात आला.

