-3.5 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्याची दुरावस्था.* *वैद्यकीय अधीक्षकांसह कर्मचाऱ्यांना दहा तास रुग्णालयात कोंडले.* *प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाचा दणका.*

बुलढाणा

*केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्याची दुरावस्था.*

*वैद्यकीय अधीक्षकांसह कर्मचाऱ्यांना दहा तास रुग्णालयात कोंडले.*

*प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाचा दणका.*

अँकर
बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सुविधेचा बोजवारा उडाल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाकडून धाड येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व कर्मचाऱ्यांना सकाळी 11 वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत कोंडून ठेवत प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलन केलं. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने हे आंदोलन केल. धाड येथील ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सुविधा रुग्णांना मिळत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते व कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजता धाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात आल्यावर वैद्यकीय अधीक्षक व सर्व कर्मचाऱ्यांना एका हॉलमध्ये कोंडून हे आंदोलन केलं. शेवटी रात्री साडेआठ वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी या आंदोलनाची दखल घेत त्या ठिकाणी पोहोचत येत्या पंधरा दिवसात धाड येथील ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सुविधा देण्यात येतील अस लेखी आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं व वैद्यकीय अधीक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना प्रहार जनशक्ती पक्षाकडून सोडून देण्यात आले मात्र केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात मूलभूत आरोग्य सुविधा नागरिकांना मिळत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आला आहे.

बाईट्स – वैभव राजे मोहिते , जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष.

Related Articles

ताज्या बातम्या