-3.5 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

मोताळा नगर पंचायतचे काँग्रेसचे सहा नगरसेवक भाजपात दाखल भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या हस्ते तर भाजपा जिल्हाध्यक्ष मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश

मोताळा नगर पंचायतचे काँग्रेसचे सहा नगरसेवक भाजपात दाखल

भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या हस्ते तर भाजपा जिल्हाध्यक्ष मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश

नागपूर:- बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतचे काँग्रेसचे नगर पंचायत उपाध्यक्ष शेख सलीम चुनावाले तसेच नगरसेवक सर्व श्री कैलास खर्चे, तस्लिम बाबा, संदीप वानखेडे, आसिफ कुरेशी , विजय सुरडकर ( सर्व काँग्रेस) यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष मा.आ.आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून नागपूर येथे आज दि. ३ जून २०२५ रोजी भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष श्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला. नागपूर येथील बि.आर.मुंडले सभागृह येथे आज विदर्भ भाजपची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. या कार्यशाळेत हा जाहीर पक्ष प्रवेश संपन्न झाला.

 

तसेच अजूनही काही नगरसेवक हे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. सद्यस्थितीत मोताळा नगर पंचायतीत भाजपचा एकही नगरसेवक नसतांना झालेल्या या पक्ष प्रवाशाने भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली असून काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले असून पक्षाची मोठी ताकद निर्माण होणार आहे.

यावेळी प्रदेश सरचिटणीस आ.रणधीरजी सावरकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्रजी कोठेकर, खा अनिलजी बोंडे, खा अनुपजी धोत्रे, बुलढाणा येथून भाजपा माजी जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे, जिल्हा सचिव चंद्रकांत बरदे, जिल्हा सचिव दत्ता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम लखोटिया ई मान्यवरांची उपस्थिती होती.

Related Articles

ताज्या बातम्या