-2.9 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्षभूमीवर भाई अशांत वानखेडे अक्षण मोडवर.. विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटींगाठी वाढल्या.. केंद्रीयमंत्री रक्षा खडसे व एकनाथ खडसे यांच्या भेटी घेतल्या..

बुलढाणा

स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्षभूमीवर भाई अशांत वानखेडे अक्षण मोडवर..

विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटींगाठी वाढल्या..

केंद्रीयमंत्री रक्षा खडसे व एकनाथ खडसे यांच्या भेटी घेतल्या..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी च्या पार्षवभूमीवर समतेचे निळे वादळ संघटनेचे अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केल्या आहेत.. संघटनेचे जाळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात पसरलेलं आहे.. 50 वर्ष संघर्षाची चळवळ चालवून राजकीय अस्तिव कायम ठेवण्यात मोठ यश अशांत वानखेडे यांना प्राप्त आहे….
जनतेच्या समस्या अडी अडचणीत सातत्याने अविरत काम करणारे अशांत वानखेडे आजही मलकापूर येथील जनतेच्या समस्या घेऊन केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याकडे गेले होते यावेळी पुढील पुढील राजकीय घडामोडीवर सविस्तर चर्चा सुद्धा करण्यात आली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) चे एकनाथ खडसे यांची सुद्धा भेट घेतली तिथेही सर्व राजकीय घडामोडीवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे..

महत्वाची समस्या म्हणजे मलकापूर येथे बांधण्यात आलेल्या भिंतीमुळे प्रवाशांना रेल्वे प्लॅटफॉर्मकडे जाण्यासाठी तब्बल दोन किलोमीटरचा वळसा घ्यावा लागत आहे. या प्रश्नावरून नाराजी व्यक्त करत समतेचे निळे वादळ संघटनेचे अध्यक्ष अशांत वानखेडे यांनी काही पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भेट घेतली. या भेटीत प्रवाशांच्या गैरसोयीबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली; मात्र एवढ्यावरच गोष्ट थांबली नाही. वानखेडे यांनी या दौऱ्यात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचीही भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नातून काही ‘मोठेच’ राजकीय समीकरण तर नाही ना जुळत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘भाई’ आणि ‘ताई’ व ‘भाऊ’ यांची ही भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या