-
*लोकसभेच्या निवडणुकीत महायुती विरोधात महाविकास आघाडी…महायुतीचे प्रतापराव जाधव यांची टक्कर कोणाशी… ?*
बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील महायुती व महाविकास आघाडी यांच्या एकाही उमेदवारची घोषणा अद्याप झाली नसल्याने मतदारामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे… बुलढाणा जिल्ह्यात महायुतीचा संभाव्य उमेदवार विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा आहे.. तर महाविकास आघाडीकडून चार उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत…
नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) चे निरीक्षक जिल्ह्यात येऊन गेले तब्बल 10 दिवस तळ ठोकून होते, त्यांनी उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी थेट चर्चा केली, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शहर प्रमुख, तालुका प्रमुख शाखा प्रमुख जिल्हा प्रमुख या सर्वासोबत बैठका घेऊन चर्चा केल्या.. दरम्यान पक्षा बाहेरील इच्छूक उमेदवाराणी उबाठा पक्ष निरीक्षक यांच्या भेटीं घेतल्या.. व मते जाणून घेतले..
शेवटी अंतिम अहवाल घेऊन मातोश्री मुंबई गेले आहेत.. त्यातून उमेदवार घोषित केल्या जाईल..
शिंदे गटाचे खासदार प्रतापरावं जाधव यांनी जिल्हातील सर्व गावामध्ये जाऊन नागरिकाच्या भेटींगाठी घेणे सुरु केले आहे.. व मतांची गोळंबेरीज करणे सुरु केले आहे.. शिन्दे गटाचे आ संजय गायकवाड यांनी बुलढाणा लोकसभा ही आमचीच कायम राहील असा दावा केला असल्याने विद्यमान खासदार प्रतापरावं जाधव यांची उमेदवारी नक्की असल्याचे शिंदे गटात चर्चा आहे.. त्यामुळे महायुतीचे जर प्रतापराव् जाधव हे उमेदवार् असतील तर यांची सरळ टक्कर कोणाशी राहील,? कोण असणार महायुतीचा सक्षम उमेदवार ? हे आता येणारा काळच ठरवेल… थोडक्यात एव्हढेच…