बुलढाणा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार…. महाविकास आघाडी का महायुती… कोणाचा होणार विजय …!!!!
बुलढाणा लोकसभेत कोण बाजी मारणार हा प्रश्न जिल्ह्यात चर्चिल्या जात आहे… महाविकास आघाडी का महायुती…
उमेदवार निश्चित व्हायचे आहेत अद्याप पर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवार निश्चित केले नाहीत.. मात्र लढत महाविकास आघाडी व महायुतीत् होणार हे निश्चित असल्याचे जानकार सांगत आहेत… महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार हे धुमधडाक्याने प्रचार सभा घेत असल्याचे दिसत आहेत त्या तुलनेत काँग्रेस च्या कुठल्याही सभा होताना दिसत नाहीत.. वास्ताविक पाहता देशात दोनच पक्ष मोठे व जुने आहेत भाजपा व काँग्रेस…. मात्र काँग्रेस नेते वरिष्ट पातळीवर फक्त बैठका घेताना दिसत आहेत.. कुठेही बूथ कमेट्या तयार करताना किंवा त्यांच्या बैठका होताना दिसत नाहीत हे तेव्हढच सत्य आहे… उबाठा व राष्ट्रवादी शरद पवार गट हे सक्रिय झाले असून राज्यात सभा घेण्याचा सपाटा लावलाय.. असो…
बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस नेते अति उत्सहाहीत आहेत.. मात्र त्यांच्यात बरेच गट तयार झाले आहेत.. प्रत्येक गटाचा नेता स्वतः पुरता मिरवीत असतो आजही मुकुल वासानिकांची पकड जिल्हात आहेत.. मात्र जिल्ह्यात काँग्रेस संपुष्ठात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे… काँग्रेस नेते एकमेकांचे पाय ओढण्यातच मग्न आहेत याचाच फायदा होताना दिसून येत आहे.. जोपर्यंत काँग्रेस नेते एकत्रित बसून निर्णय घेणार नाही तोपर्यंत जिल्ह्यावर काँग्रेस विरोधकांची पकड कायम राहील हे स्पष्ट आहे…
तर दुसरीकडे उबाठाचा कोणताही उमेदवार निश्चित झाला तर त्याला साथ देणारा उबाठा कार्यकर्ता व जागृत मतदार सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.. शरद पवार राष्ट्रवादी यांचं अजून पर्यंत कुठलंही कार्य जिल्ह्यात दिसून येत नसल्याने मतदार त्यांच्या पाठीशी नसल्याचे चित्र आहे… अस एकंदरीत लोकसभेत चित्र राहिले तर या लोकसभेत बाजी कोण मारणार हे स्पष्ट सांगणे कठीणच आहे… अजुन पर्यंत स्पष्टता नसल्याने सर्वकाहि संभ्रमात आहे .. एव्हढे मात्र निश्चित…