- अखेर स्वगृही जि प सिईओ विशाल नरवाडे यांच्या बदलीचे आदेश पारित..झाद हिंदच्या लढ्याला मोठे यश…**अखेर लोकशाहीचा विजय झाला… ॲड.सतीशचंद्र रोठे.*
आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये करिता आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे यांनी बुलढाणा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची बदली करावी. भारतीय निवडणूक आयोगाने विश्वासहर्ता टिकून ठेवावी. यासाठी भारतीय निवडणूक आयोग, महाराष्ट्र निवडणूक आयोग, राष्ट्रपती, राज्यपाल यांच्याकडे तक्रार करीत आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता.
अखेर आझाद हिंद च्या गंभीर मागणी व आंदोलनाची दखल घेत भारतीय निवडणूक आयोगाने 18 मार्चला महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव यांना पत्र देऊन या अनुषंगाने विचारणा केली. 19 मार्च सायंकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशित केले.
त्या अनुषंगाने आज बुलढाणा जिल्हा सामान्य प्रशासन विभागाचे नितीन गद्रे यांच्या स्वाक्षरीने विशाल नरवाडे यांची बदली होऊन त्यांच्या जागी भाप्रसे अंकित यांनी पदभार स्वीकारण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. यामुळे आझाद हिंद ने केलेल्या मागणीला मोठे यश मिळाले असून यामुळे लोकशाहीचा विजय झाल्याची प्रतिक्रिया आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे यांनी व्यक्त केली आहे.
बाईट – सतीशचंद्र रोठे, राष्ट्रीय अध्यक्ष आझाद हिंद शेतकरी संघटना