*बुलढाणा ब्रेकिंग..*
*बुलढाण्याची जागा काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता..*
*महाविकास आघाडीत झालेल्या चर्चेनंतर, उबाठा ऐवजी काँग्रेस ला सुटणार जागा..!*
अँकर
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अद्यापही महायुती किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झालेली नाही. महायुतीकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव तर महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना संभाव्य उमेदवार म्हणून घोषित करण्यात आल आहे मात्र अद्यापही दोघांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र महाविकास आघाडीत झालेल्या चर्चेनुसार काही जागेची अदलाबदल होण्याची शक्यता असल्याने बुलढाण्याची जागा काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस एडवोकेट जयश्री शेळके यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे….