मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी ते एकांबा शेतशिवारात जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था पहिल्याच पावसात झाली. जुना रस्ता होता तो नवीन डांबरीकरण करण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आला. परंतु हा रस्ता अर्धवट झाल्यामुळे पहिल्या रस्त्यापेक्षा आता खूप मोठी दयनीय अवस्था रस्त्याची झाली आहे. पेरणीसाठी शेतात ट्रॅक्टर नेण्याचा प्रश्न शेतकऱ्यांवर उभा ठाकला आहे. या रस्त्यावरून ट्रॅक्टर घसरून थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ संबधित ठेकेदाराच्या विरोधात आंदोलनाच्या तयारीत असून या समस्या बाबतीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्या ची माहिती देण्यात आली लवकरात लवकर संबंधित ठेकेदार यांनी रस्ता व्यवस्थित करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय..