जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने दळण वळण सेवा वाढली पाहिजे.. त्यासाठी रेल्वे मार्ग व विमानतळ होने गरजेचे आहे त्यासाठी अगोदर बुऱ्हाणपूर ते छत्रपती सांभाजी नगर असा रेल्वे मार्ग मंजूर करावा अशी मागणी आ संजय गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री प्रतापरावं जाधव यांचेकडे केली आहे.. ना प्रतापरावं जाधव यांचा नागरी सत्कार बुलढाण्यात आयोजित् केला होता त्यावेळी आ गायकवाड यांनी नकाशा दाखवून नवीन रेल्वे मार्गाची मागणी केली आहे…उत्तर भारत ते दक्षिण भारत असा रेल्वे मार्ग जोडणारा आहे.. हा रेल्वे मार्ग केंद्रात मंजूर करावा तसेच जिल्ह्यात विमानतळ होने गरजेचे आहे.. लोणार सरोवर, सिंदखेडराजा जिजाऊ जन्मस्थान व संत गजानन महाराज संत नगरी शेगाव आहे पर्यटक व बाविकाणचत सोयीसाठी विमानतळ होने आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.. या बाबतची मागणी जिल्हावासियांची आहे त्यामुळे आता तातडीने लक्ष घालून हे प्रकल्प मंजूर करावा..