7.2 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

*दहा वर्षापासून आपल्या मागण्यांसाठी लढा देणारे पदमने कुटुंब झाले हताश…* *शासनाकडे मागितली सहकुटुंब इच्छा मरणाची परवानगी…*

  • *बुलढाणा

*दहा वर्षापासून आपल्या मागण्यांसाठी लढा देणारे पदमने कुटुंब झाले हताश…*

*शासनाकडे मागितली सहकुटुंब इच्छा मरणाची परवानगी…*

*बनावट दस्तावेज बनवणाऱ्या अधिकाऱ्यांना व संबधीतांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार देण्यात यावा*

*घराला रस्ता नसल्याने उड्डाणपुल बनवण्याची परवानगी ची मागणी*

*दस्तावेजाची कायदेशीर पत्रकार परिषदे घेऊन त्यावर चर्चा करावी*

*दप्तर दिरंगाई करून खोटी माहिती व खोटे दस्तावेज सादर करून वरिष्ठांची व शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच संबंधितांवर निलंबित किंवा बडतर्फ ची तात्काळ कार्यवाही करावी*

*मला देण्यात आलेले दस्तावेज समजावून सांगणाऱ्या अधिकाऱ्यास तब्बल 30 लाखाची जागा बक्षिस*

*जिल्हाधिकारी साहेब यांनी दस्तावेज हे कायदेशीर बरोबर किंवा चुकीचे असल्याबाबत,स्वयंस्पष्ट अहवाल द्यावा*

*ग्रामपंचायत गेटसमोर निवारा म्हणून राहण्याची परवानगी देण्यात यावी*

*यापैकी कोणतीही मागणी पूर्ण होत नसेल किंवा शासन आपल्या कर्तव्य पार पाडू शकत नसेल कमी पडत असेल तर मारून टाका अशी भूमिका घेऊन मागणी केली*

मेहकर/बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील समाधान पदमने यांच्या जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून जागा परस्पर दुसऱ्याच्या नावावर करून दिल्याने समाधान पदमने यांचे जिल्हाधिकारी यांना दहा वर्षांपासून पाठपुरावा. उदा.सदर असे असतांना समाधान पदमने यांच्याकडे वाटणीपत्रक दि.8/7/2014 रोजीचे असतांना ग्रामपंचायत रेकॉर्ड ला त्याचा ठराव दि.28/3/2014 रोजी आला व कोणत्या आधारावर घेण्यात आला तसेच इतर दस्तावेज यांची पारदर्शक व बारकाईने चौकशी व्हावी. समाधान पदमने यांच्याकडे जागेचे सर्व अधिकृत दस्तऐवज असून ते गेल्या दहा वर्षापासून आपल्याला न्याय मिळावा यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत, आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केल्यात, आंदोलने उपोषण केलीत, त्यांचे सर्व चौकशी अहवाल व इतर कायदेशीर पुरावे असुन प्रशासनाला वारंवार देऊन परंतु मात्र अजूनही प्रशासन पळवाटा व दप्तर दिरंगाई करत असुन संबंधितांची पाठराखण करून त्यांना खतपाणी घालत आहे त्यामुळे त्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर पदमने कुटुंब हतास झाले आहे. पत्रकार तथा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींवर असा अन्याय व ही वेळ येते तर सर्वसामान्य जनतेचे काय असा प्रश्न उपस्थित होतो ? यासाठी समाधान पदमने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सहकुटुंब इच्छा मरणाची व इतर मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले….

Related Articles

ताज्या बातम्या