बुलढाणा
*घाटावरील तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा…*
*पाणी टंचाई च संकट कायम..*
*बुलढाणा शहर वासियांना करावा लागणार पाणी टंचाई चा सामना..*
जिल्ह्यातील घाटाखालील खामगाव , मोताळा व शेगाव तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार झाला.. असंख्य शेतकऱ्यांच्या शेत जमिनी पिकासह वाहून गेल्या आहेत.. अतोनात नुकसान झाले आहे .. तर दुसरीकडे घाटावरील सहा तालुक्याला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.. शेती पेरल्या गेली मात्र पावसा अभावी पिके सुकायला लागली आहे..
तसेच जिल्ह्यात पाणी टंचाई च संकट कायम आहे. 80 टँकर सुरु आहेत बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या येळगाव धरणातील पाणी संपायला लागलाय.. केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे.. खडकपूर्णा कायम स्वरूपी पाणी पुरवठा योजना अद्याप पूर्ण झाली नाही जिल्हा प्रशासन यबाबतीत अनुभिज्ञ दिसून येत आहे.. पर्यायी योजना कार्यानवीत करणे आवश्यक असताना कुठलेही ठोस पाऊल जिल्हा प्रशासनाकडून उचलल्या जात नसल्याने नागरिक हैराण झाले आहे… तात्काल खडकपूर्णा पाणी योजना पूर्ण करून शहरवासियांची तहान भागविण्याचे काम करावे अशी मागणी बुलढाणेकरांनी केली आहे….