बुलढाणा
*आत्महत्याग्रस्त कुटुबियांना ५ लाखाची वाढीव मदत देण्याची मनसेचे अमोल रिंढे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…*
राज्यात अजूनही शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबताना दिसत नाही, गेल्या सहा महिन्यात सरकारच्या उदासीन धोरणांमुळे १२६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यामध्ये अमरावती विभागात ५५७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे, ज्यामध्ये बुलढाण्यात साडेपाच महिन्यात ८३ शेतकऱ्यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे, तरी सरकारने तात्काळ आत्महत्या थांबविण्यासाठी नवीन ध्येय- धोरणे आखून आत्महत्याग्रस्त कुटुबिंयांना दिली जाणारी तुटपुंजी मदत १ लाखावरुन ५ लाख करावी, अशी मागणी मनसे नेते अमोल रिंढे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे…