पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
- आंबेडकरी चळवळीचे विश्वासू, निष्पृह,निर्भीड पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे यांना दि.१७ जुलै २०२४ बुधवार रोजी दुपारी ०१:०० वाजता, मौलाना आझाद सभागृह टीव्ही सेंटर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन येथिल निळे प्रतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने केले होते. यावेळी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, बोर्डे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, जे जे हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ जिवन रजपूत, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज चे प्राचार्य डॉ पी जे हेलोडे, धनंजय बोर्डे, पी. बी अंभोरे, मिलींद थोरात, रविंद्र जोगदंडे, मिलींद दुसाने रमेश मुळे,डॉ प्रमोद दुथडे, संजय सुरडकर, कृष्णा शिंदे, देवचंद राठोड उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक रतन कुमार साळवे यांनी केले संचलन व आभार शिंदे यांनी मानले.