*बुलढाणा ब्रेकिंग*
*शेगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्राला आग…. रोख रकमेसह लाखोंची सामग्री जळून खाक.*
शेगाव येथील मुख्य मार्गावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला लागून असलेल्या ग्राहक सेवा केंद्राला आग लागून रोख रकमेसह कॉम्पुटर , फर्निचर जळून खाक झाल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला लागूनच एक पेट्रोल पंप आहे , पेट्रोल पंपाच्या जमिनीखाली असलेल्या पेट्रोल टाकीची साफसफाई सुरू असताना त्यातील पेट्रोल काही प्रमाणात बँक परिसरात पसरल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे. मात्र आग तात्काळ नियंत्रणात आल्याने मुख्य शाखेला नुकसान झालं नाही.