5.5 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

*मानस फाउंडेशनचे वृत्त गौरव पुरस्कार जाहीर.. .. पत्रकार रंजितसिंग राजपूत, कैलास राऊत, संदीप वानखेडे व शौकत शहा यांना झाला पुरस्कार जाहीर…*

*मानस फाउंडेशनचे वृत्त गौरव पुरस्कार जाहीर.. .. पत्रकार रंजितसिंग राजपूत, कैलास राऊत, संदीप वानखेडे व शौकत शहा यांना झाला पुरस्कार जाहीर…*

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मानस फाउंडेशनच्या वतीने वृत्तपत्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा “वृत्तगौरव पुरस्कार” देवून गौरव करण्यात येत आहे. या वर्षीच्या पुरस्कारासाठी पत्रकार रणजित सिंग राजपूत, पुढारी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संदीप वानखेडे, दै.बातमीजगत चे संपादक कैलास राऊत ,शौकत शहा यांची निवड करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट रोजी सदर पुरस्कार वितरण समारंभ बुलढाणा येथे होत आहे.

मानस फाउंडेशन म्हटले की आठवते ते विधवा विवाहाची चळवळ, विधवा परिषदा, विधवांसाठी कार्य, प्राध्यापक डी एस लहाने यांनी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. त्यांच्या संकल्पनेत उभे राहिलेले मानस फाउंडेशन आज राज्यभर सामाजिक कार्यासाठी ओळखले जात आहे. याच फाउंडेशनच्या माध्यमातून या वर्षीसाठी पहिल्या वृत्तगौरव पुरस्कारची घोषणा निवड समितीचे डी. एस. लहाने,गणेश निकम केळवदकर,प्रा.शाहिना पठाण यांनी केली आहे.पत्रकार रणजित सिंग राजपूत, संदीप वानखेडे ,कैलास राऊत, शौकत शहा या तरुण फळीची ची निवड यंदासाठी केली आहे. पत्रकार रणजीत सिंग राजपूत यांनी सकारात्मक पत्रकारितेचा परिचय जिल्हा वाशीयांना दिला आहे. खुसखुशीत आणि सदाबहार व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले रणजीत सिंग राजपूत हे सकस लेखणीचेही धनी आहे.आपल्या चतुरस्त्र लेखणीच्या माध्यमातून सकारात्मक पेरणी ते करीत आले आहे. भले तरी देऊ काशीची लंगोटी या वृत्तीने पत्रकारितेचे वान घेवून ते वावरत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विविध सामाजिक चळवळीशी ते निगडित असून जिल्ह्याचे प्रश्न धसास लावण्यासाठी त्यांची लेखणी कायम झिरपत आली आहे. टीव्ही न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संदीप वानखेडे हे सुद्धा गेल्या क्रीत्येक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. त्यांनी आपल्या संशोधक पत्रकारितेचा परिचय दिला आहे. अलगद बातमी शोधणे व उपेक्षित विषयांना वाचा फोडणे हे वानखेडे यांचे वैशिष्ट्य राहिले आहे. तर दै. बातमीजगत संपादक कैलास राऊत यांनी देऊळगाव माळी सारख्या खेडे गावातून दैनिक चालून अनेकांना लिहिते केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या