जिल्ह्यात भीम आर्मी झाली सक्रिय… जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी घेतला आढावा. .. बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय..
- जिल्ह्याला सामाजिक सक्षम नेतृत्वाची गरज होती ती आता भीम आर्मी च्या माध्यमातून भरून निघाली आहे.. तसेच केंद्रात भीम आर्मीचे संस्थापकी अध्यक्ष चंद्रशेखर आझाद हे खासदार म्हणून निवडून गेल्याने देशात खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला न्याय मिळणार असल्याचे बोलले जात आहे.. मागील काळात राज्यात चार नेताच्या हातात सत्ता दिली होती मात्र काहीही फायदा होताना दिसला नाही त्यामुळे समाज संघटन विखूरल्या गेल्या होते आता मात्र राज्या तील प्रत्येक जिल्ह्यात भीम आर्मी स्थापण झाली आहे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या दिमाखाणे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या रूपाने उभी राहिली आहे.. संपूर्ण बहुजन समाज त्यांच्या पाठीशी सक्षम पणे उभा राहिला असल्याचे चित्र दिसून येत आहे….. त्याच धर्ती वर 18 जुलै रोजी बुलढाणा येथे भीम आर्मीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली .या बैठकीमध्ये पुढील वाटचाली संदर्भातील काही निर्णय घेण्यात आलेत. बुलढाणा जिल्हा भीम आर्मीमय करण्यासाठी भीम आर्मी ची संघटनात्मक बांधणी कशी असावी यासंदर्भात देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान विविध पदावर काम करीत असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज देखील भरून घेण्यात आले. मोताळा तालुका अध्यक्ष म्हणून सर्वानुमते सक्रिय व निडर कार्यकर्ते सतीश गुरचवळे यांची निवड करण्यात आली. आदरणीय सतीश गुरचवळे यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप मंगलमय शुभेच्छा दिल्या.