बुलढाणा
*एबीपी माझा या वृत्त वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांना राजे लखुजीराव जाधवराव स्मृती पुरस्कार जाहीर….*
राजे लखुजीराव जाधवरावांची शेतकऱ्यांबद्दल असलेली आस्था, कणव व त्यातुन त्यांनी तात्कालीन शेतीसाठी केलेली सिंचन व्यवस्था तसेच रयतेला व महिलांना दिलेले पुर्ण संरक्षण व पुर्णतः लोकल्याणकारी कार्य केले, त्यांच्या विचार व कृतीचा वारसा जो मॉ साहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांकरवी स्वराज्यात अंमलात आणला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांनी आपल्या विचार व कृतीतुन लोककल्याणकारी राज्याचा जो वसा व वारसा चालवला तोच वारसा जपत आपण आपल्या मार्फत बुलढाणा जिल्हयामध्ये एबीपी माझाच्या माध्यमातुन सर्वसामान्यांना न्याय देण्याचे, सिंदखेड राजा शहरातील जिजाऊ माँसाहेब व त्यासंदर्भातील बातम्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देत आहात तसेच गेल्या २० वर्षापासुन बाल रुग्णांची सेवा अविरत करत आहात.
या कार्याची दखल घेत डॉक्टर संजय महाजन यांची निवड ही राजेलखुजीराव जाधव स्मृती पुरस्कारासाठी करण्यात आली आहे… हा पुरस्कार 25 जुलै ला सिंदखेडराजा येथे वितरित केल्या जाणार आहे….