5.5 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

*लाडका भाऊ योजनेसाठी बेरोजगारानो अर्ज करा….*

*ही 5 कागदपत्रे हवीच नाहीतर लाडका भाऊ योजनेसाठी केलेला अर्ज होणार बाद…*

सध्या महाराष्ट्रभर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरु आहे. या योजेच्या पाठोपाठ महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि या प्रशिक्षणादरम्याने त्या तरुणांना विद्यावेतन दिले जाणार आहे. या योजनेबद्दल देखील सध्या सगळीचकडे चर्चा सुरु आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांकडे ही 5 कागदपत्रे असणे अत्यंत गरजेचे आहे. ती नसतील तर त्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. चला तर मग या योजनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

लाडका भाऊ योजेसाठी केवळ बेरोजगार तरुणांनाच अर्ज करता येणार आहे. ज्यांचे शिक्षण झाले आहे परंतु त्यांना नोकरी नाही अशा तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. म्हणूनच या योजनेचे नाव युवा कार्य प्रशिक्षण असे देखील आहे. या योजनेचा शासन निर्णय पाहिल्यानंतर तुमच्या या सर्व गोष्टी लक्षात येतील. महाराष्ट्र शासन काही कंपन्यांना यामध्ये सामील करणार आहे आणि प्रशिक्षण झाल्यानंतर या कंपन्या तरुणांना नोकरी देखील देणार आहे. परंतु यामध्ये असे देखील सांगण्यात आले आहे की, जे लाभार्थी तरुण प्रशिक्षण घेत असताना प्रशिक्षणाला 10 ते 15 दिवस गैर हजर राहतील त्यांना हे विद्यावेतन दिले जाणार नाही. त्यामुळे तरुणांना त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ही 5 कागदपत्रे हवीच नाहीतर लाडका भाऊ योजनेसाठी केलेला अर्ज होणार बाद..
सध्या महाराष्ट्रभर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरु आहे. या योजेच्या पाठोपाठ महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि या प्रशिक्षणादरम्याने त्या तरुणांना विद्यावेतन दिले जाणार आहे. या योजनेबद्दल देखील सध्या सगळीचकडे चर्चा सुरु आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांकडे ही 5 कागदपत्रे असणे अत्यंत गरजेचे आहे. ती नसतील तर त्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. चला तर मग या योजनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
यांना करता येईल लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज
लाडका भाऊ योजेसाठी केवळ बेरोजगार तरुणांनाच अर्ज करता येणार आहे. ज्यांचे शिक्षण झाले आहे परंतु त्यांना नोकरी नाही अशा तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. म्हणूनच या योजनेचे नाव युवा कार्य प्रशिक्षण असे देखील आहे. या योजनेचा शासन निर्णय पाहिल्यानंतर तुमच्या या सर्व गोष्टी लक्षात येतील. महाराष्ट्र शासन काही कंपन्यांना यामध्ये सामील करणार आहे आणि प्रशिक्षण झाल्यानंतर या कंपन्या तरुणांना नोकरी देखील देणार आहे. परंतु यामध्ये असे देखील सांगण्यात आले आहे की, जे लाभार्थी तरुण प्रशिक्षण घेत असताना प्रशिक्षणाला 10 ते 15 दिवस गैर हजर राहतील त्यांना हे विद्यावेतन दिले जाणार नाही. त्यामुळे तरुणांना त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ही आहेत अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी खालील कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे कागदपत्र अर्जासोबत जोडले नसल्यास तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

अर्जदाराची शैक्षणिक पात्रता 12 वी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी असावा.
शिक्षण घेत असलेल्या तरुणांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. ते अपात्र ठरतील.
अर्जदाराचे रहिवाशी प्रमाणपत्र.
आधार कार्ड
बँक खाते आधार कार्डशी सलग्नित असावे.
अर्जदाराकडे कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे.
याचबरोबर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पासपोर्ट आकाराचे फोटो आदी आवश्यक आहे.

लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बेरोजगार असलेल्या तरुणांना प्रशिक्षणासाठी विद्यावेतन देण्यात येणार आहे. म्हणजे बेरोजगार तरुण जेव्हा प्रशिक्षण घेतील तेव्हाच त्यांना हे वेतन मिळेल. या वेतनाची रक्कम तरुणांच्या शिक्षणावरुन ठरवण्यात येणार आहे. ती पुढील प्रमाणे. शासनाकडून देण्यात येणारे मानधन हे दर महिना असणार आहे. तरुणाला प्रशिक्षित करुन दर महिना मानधन मिळणार आहे.

12 वी पास तरुणांना महिना 6,000/- रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत.
आयटीआय किंवा पदवीका प्राप्त बेरोजगार तरुणांना महिना 8,000/- रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत.
पदवीधर आणि पदव्युत्तर बेरोजगार तरुणांना महिना 10,000/- रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत.

लाडका भाऊ योजने संबंधित शासनाने शासन निर्णय जाहीर केला आहे.

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407091701223903.pdf या लिंकवर क्लिक करुन तुम्ही योजनेसंबंधीत शासन निर्णय पाहू शकता. आणि अधिक माहिती मिळवू शकता.

महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा. तसेच लाभार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण देखील त्यांनी पूर्ण करावे जेणेकरुन शासनाने ठरवून दिलेले विद्यावेतन त्यांना मिळेल.

Related Articles

ताज्या बातम्या