बुलढाणा ब्रेकिंग…
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (ARTO) प्रसाद गाजरे यांची सांगली येथे बदली…
- बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकाळ चांगला गेल्याची भावना..
बुलढाणा जिल्ह्यातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांची सांगली येथे बदली झाली असून ते एक दोन दिवसात जिल्हा सोडून जाणार आहे… श्री गाजरे यांच्या काळातच समृद्धी महामार्गावर एक मोठा भिषण अपघात झाला होता त्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता त्यानंतर समृद्धी वर अपघाताचे प्रमाण का वाढले यावर सखोल अभ्यास करीत श्री गाजरे यांनी अनेक उपाय योजना व संकल्पना राबविल्या.. तेव्हा पासून समृद्धी महामार्गावरील अपघाता चे प्रमाण बरेच कमी झाले होते .
प्रसाद गाजरे यांनी त्यांच्या तीन वर्षाच्या काळात वाहना संबधी शासकीय योजना राबविल्या.. त्यांचा कार्यकाळ खूप चांगला गेल्या च्या भावना जनतेनी व्यक्त केल्य आहेत्… त्यांच्या जागेवर बुलढाणा येथे अद्याप पर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याचे समोर आले नाही..