उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मानवतावादी उपक्रमाने सत्ताह साजरा करणार
प्रा. डॉ. गोपाल बच्छिरे
उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मानवतावादी उपक्रमाने सप्ताह साजरा करणार असल्याचे शिवसेनेचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छिरे यांनी कळविले आहे.
मेकर लोणार विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ, शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप, गोरगरिबांना ब्लॅकेटचे वाटप, शासकीय रुग्णालयात फळवाटप, गोंड वैदूंच्या पालांवर मिठाईवाटप आणि चार ऑगस्ट रोजी मेहकर येथील नगरपालिकेच्या मैदानावर महाआरोग्य शिबिरात संभाजीनगर एम्स हॉस्पिटल व अल्पाइन हॉस्पिटल च्या माध्यमानेरोगनिदान व औषध उपचार, यात कॅन्सर, हृदयरोग, किडनीविकार डोळ्याच्या आजारावर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे या शिबिराचे उद्घाटन विधान परिषद विरोधी पक्षनेते नामदार अंबादासदादा दानवे यांच्या हस्ते होऊन सदरील कार्यक्रम जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्रभाऊ खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाप्रमुख जालिंदरभाऊ बुधवत जिल्हा सहसंपर्कप्रमुख छगनदादा मेहेत्रे, जिल्हाउपप्रमुख आशिषभाऊ रहाटे, युवा जिल्हाप्रमुख नंदू भाऊ कऱ्हाडे, मेकर तालुकाप्रमुख लिंबाजी पांडव, मेहकर शहर प्रमुख किशोरभाऊ गारोळे, लोणार शहर प्रमुख गजानन जाधव, एड. आकाश घोडे, जीवन घायाळ ऋषी जगताप श्रीकांत मादनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर होणार आहे अशी माहिती शिवसेना बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी दिली आहे