5.5 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

मंत्रालयातील सहसचिव पदावरून इच्छासेवा निवृत्ती घेणारे सिद्धार्थ खरात यांचा सेवा पूर्ती सोहळा कार्यक्रम संपन्न… आतापर्यंत तीन उच्चं पदस्थ अधिकार्यानी घेतली इच्छासेवा निवृत्ती….

बुलढाणा….

मंत्रालयातील सहसचिव पदावरून इच्छासेवा निवृत्ती घेणारे सिद्धार्थ खरात यांचा सेवा गौरव सोहळा कार्यक्रम संपन्न…

आतापर्यंत तीन उच्चं पदस्थ अधिकार्यानी घेतली इच्छासेवा निवृत्ती….

बुलढाणा जिल्ह्यातील तीन उच्चं पदस्थ अधिकारी सुनील शेळके, दिनेश गिते व आता सिद्धार्थ खरात यांनी आपली सेवा इच्छा निवृत्ती घेतली आहे…

हे तीनही अधिकारी राजकारणात येऊ पाहत आहे.. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलढाणा अर्बन चे अध्यक्ष भाईजी उर्फ राधेशाम चांडक यांनी जाहीर करून टाकलं.. .
सिद्धार्थ खरात यांचा सेवा गौरव सोहळा कार्यक्रम बुलढाण्यातील गोवर्धन हॉल मध्ये पार् पडला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विचारपीठावर उद्योजक तथा चित्रपट निर्माते सुनील शेळके, नुकतेच इच्छा सेवा निवृत्ती घेतलेले दिनेश गिते, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरोषोत्तम खेडेकर, सदानंद देशमुख, बुलढाणा अर्बन चे अध्यक्ष भाईजी राधेधाम चांडक , यांच्यासह मान्यवर उपस्थित होते…

काल परवा सिद्धार्थ खरात यांनी इच्छासेवा निवृत्ती घेतली त्यांना शुभेच्छा देण्यासाठी असंख्य नागरिक महिला पुरुष एकत्रित जमले होते.. यावेळी सुनील शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सिद्धार्थ खरात यांचा संबध मंत्राल्यातील सह् सचिव पदावर काम करीत असलेले यांच्याशी आला तेव्हाचा अनुभव सांगितला तसेच त्यांच्या मनातील संकल्पना इच्छा पूर्ण होवो अश्या शुभेच्छा दिल्या…

दिनेश गिते यांनी आपल्या शासकीय सेवेत असताना संपर्क कसा आला ते विषद केले.. व भावी जीवनात त्यांनी जनसेवा करण्यासाठी राजकारणात यावे असे सूचक वक्तव्य केले..

तर भाईजी उर्फ राधेशाम चांडक यांनी तर जाहीरच करून टाकलं की दिनेश गिते, सिद्गार्थ खरात व सुनील शेळके यांच्या पत्नी जयश्रीताई शेळके यांनी विधानसभेत निवडणूक लढून निवडून यावे व जिल्ह्याचा विकास करावा त्यांच्या सोबत आम्ही सर्व आहोत… असे वक्तव्य करून सर्वांच्या मनातील तसेच तिघांच्या मनातील गुपित फोडले… तसेच जिल्ह्याच्या विकासावर लक्ष देऊन जगाच्या नकाशावर बुलढाणा जिल्ह्याचे नाव कसे स्पष्ट दिसेल असे काम करावे असे बोलून तिघाणाही राजिक्य कारकिर्दी विषयी शुभेच्छा देऊन आपले मनोगत संपविले…

यावेळी बुलढाण्यातील पत्रकारांनी सिद्धार्थ खरात यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या…

Related Articles

ताज्या बातम्या