बुलढाण्यात आ गायकवाड यांनी तलवारीने कापला केक..
वाढदिवसाचा केक तलवारीने कापने हा गुन्हा नाही…
राजकीय स्टेज कार्यक्रमात तलवार भेट दिल्यानंतर तलवार दाखवीने हा गुन्हा आहे का ? आ गायकवाड यांचा प्रश्न..
स्वातंत्र दिवस 15 ऑगस्ट ला आ संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय यांचा वाढदिवस मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.. बुलढाणा शहरातील शिवसेना मातोश्री कार्याल्यासमोर मोठा स्टेज उभारण्यात येऊन आ गायकवाड यांनी तलवारीने केक कापला व आपल्या कुटुंबंातील सर्व सदस्यांना तो केक भरविण्यात आला.. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण फेसबुक वरून करण्यात आले होते.. आ गायकवाड यांनी तलवारीने केक कापल्याने विरोधकांनी टिकेची झोड उडविली.. काँग्रेसच्या सचिव जयश्री शेळके यांनी प्रतिक्रिया देताना , सर्व सामान्य व्यक्तीने वाढदिवसाचा केक कापला तर तातडीने पोलीस गुन्हे दाखल करतात कायदा सर्वासाठी समान आहे.. विद्यमान आमदार यांचावर् पोलीस गुन्हे दाखल करतील का असा शेळके ताई नी प्रश्न उपस्थित केलाय तिकडे विरोधी पक्ष नेता विजय वेडिट्टिवार यांनी सुद्धा ट्विट करीत सरकारावर टिका केली.. तसेच माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा खोचक टिका केली..
या सर्वांना आ संजय गायकवाड यांनी सडेतोड उत्तर दिले.. आ गायकवाड हे बोलताना, तलवारीने केक कापने गुन्हा नाही, कुठेही कायदा तोडला नाही, राजकीय स्टेजवर लाखो जनतेसमोर आयोजक तलवार भेट देतात तेव्हा संबधित व्यक्ती तलवार हातात घेऊन उपस्थिताना दाखवतो मग तो गुन्हा आहे का ? ओलम्पिक मध्ये तलवारबाजी, पिस्टल नेम, रायफल नेमबाजी तसेच पोलीस परेड मध्ये सुद्धा सलामी देताना तलवार दाखविली जाते या सर्व बाबीवर गुन्हे दाखल करा.. अन्यथा सर्व बंद करा.. आणी मी गुन्हा केला नाही .. यावर मी ठाम असल्याच आ गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे…