भरधाव वेगाने जाणाऱ्या अपेआयटो ला जंगली प्राणी रोहीची जबर धडक…
अपघातात एका महिलेचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी
अंधेरा फाट्या नजीक सायंकाळी घडली घटना..
रस्त्याच्या दुतर्फा जाळ्या लावाव्यात.. ग्रामस्थांची मागणी
तांबोळा येथून एक घरगुती कार्यक्रम आटपून काही मशीला पुरुष असोला येथे जात असताना चिखली जालना महामार्गावर एक जंगली प्राणी रोही रस्त्यावर धावत आला व रस्त्याने जात असलेल्या अपेला जबर धडक दिली.. या धडकेत् आटोरीक्षा पलटी झाला व आटो मध्ये बसलेल्या महिला पुरुष बाहेर फेकल्या गेले या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले असून जखमी वर चिखली येथील रुग्णाल्यात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे, ही घटना सायंकाळी घडली असून अंधेरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे… मेरा बुद्रुक ते अंधेरा फाटा दरम्यान जंगल परिसर आहे.. या जंगलात रोही, कोल्हे , लांडके सह आदी जंगली प्राण्याचा वावर जास्त प्रमाणात आहे.. या रस्त्यावर रोही मुळे बरेच अपघात झाल्याची घटना घडल्या आहेत.. हा महामार्ग जंगल परिसरातून जात असल्याने वन विभागाने तातडीने मेरा बुद्रुक चौकी ते अंधेरा फाटा दरम्याने रस्त्याच्या दुतर्फा जाळ्या लावाव्यात अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे..