अनुसूचित जाती मध्ये उपवर्गीकरण व क्रिमिलेयरच्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णया विरुद्ध भारत बंद ची हाक
उद्या 21 ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती मध्ये उपवर्गीकरण व क्रिमिलेयरच्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णया विरुद्ध भारत बंद ची हाक एससी एसटी संघटनांनी दिली या बाबत चर्चा करण्यासाठी मलकापूर विश्रामगृहात ॲड.विजयकुमार कस्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली समतेचे निळे वादळ या संघटनेचे संस्थापक अशांतभाई वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीत ॲड विजयकुमार कस्तुरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत विस्तृत माहिती देऊन कार्यकर्त्यांशी समर्पक चर्चा केली.
दिनांक 21 रोजी होऊ घातलेल्या भारत बंद ला जिल्ह्यातून तात्विक रित्या समर्थन देण्याचे ठरले. या दिवशी जिल्हा व तालुका स्तरावर महामहीम राष्ट्रपती यांचे नावे तहसीलदार एसडीएम व शक्य झाल्यास जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्याचे यावेळी भाई प्रकाश पचेरवाल, ॲड. बी एस वानखडे, ॲड. एम वाय इंगळे, ॲड. स्नेहल तायडे, ॲड. निकम, मोहन खराटे, विजयकांत मोरे, विजय वानखेडे, साहित्यिक भिकाजी तायडे, संजय गवई, गणेश कळासे, रवी भारसाकळे, राजेश रायपुरे, सनी मगरे व समतेचे निळे वादळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*