*काळे झेंडे, काळे रुमाल बांधुन महाविकास आघाडीचे संगम चौक बुलडाणा येथे लैंगिक अत्याचाराच्या विरोधात मुक निषेध आंदोलन.*
बदलापूर , कलकत्ता अकोला तसेच महाराष्ट्रात महिलावर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे आज दिनांक २४/८/२०२४ रोजी महाराष्ट्र बंदची हाक पुकारलेली होती, परंतु उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या सन्मान राखत महाविकास आघाडीने काळे झेंडे, काळे रुमाल बांधून मुक निषेध आंदोलन करण्यासंदर्भात पदाधिकारी यांना सूचना केल्या होत्या.
त्यानुसार आज संगम चौक बुलढाणा येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळे झेंडे, काळे रुमाल बांधून निषेध आंदोलन करत सरकारचा निषेध केला व बदलापूर घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी मागणी केली.
यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.