बुलढाणा
*बुलढाण्यात आ.संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ.*
*जिजाऊंच्या जिल्ह्यातील बुलढाणा मतदार संघ महिलांसाठी राखीव ठेवा.*
*शिंदेच्या शिवसेना महिला नेत्याचे बंडखोरीचे निशाण.*
विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत आणि त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार हे तयारीलाही लागले आहेत….बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा गेल्या पाच निवडणुकात शिवसेनेचा गड राहिलेला आहे…. बुलढाण्याचे विद्यमान आ.संजय गायकवाड या मतदारसंघातून पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करत आहेत मात्र आता याच मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या प्रेमलता सोनवणे – पाटील यांनी या मतदारसंघावर दावा ठोकत राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यात बुलढाणा मतदार संघ हा शिवसेनेने महिलांसाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्याची मागणी केली व त्या दृष्टीने पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याची ही माहिती त्यांनी दिली आहे. पक्षाने उमेदवारी नाही दिली तरीही त्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून लढण्यावर ठाम असल्याने व तशी तयारीही त्यांनी सुरू केल्याने आता शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान आ. संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झालेली आतापासून दिसत आहे. त्यामुळे प्रेमलता सोनवणे – पाटील यांनी निवडणुकीच्या आधीच बंडाचे निशान फडकवल आहे.