*शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या “मशाल यात्रा” ला सुरुवात…151 गावातून जाणार माशाल यात्रा…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुलढाणा विधानसभा मतदारसंघात निष्ठुर सरकारच्या विरोधात मशाल यात्रेचा मोताळा शहरातून शुभारंभ झाल्यानंतर सांगळद, तिघ्रा, आडवीहीर, जयपुर , वरूड, खरबडी, इब्राहिमपूर , लोणघाट, कोथळी या गावात मशाल यात्रेचा दौरा संपन्न झाला. दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी बुलडाणा येथे होणाऱ्या “आक्रोश मोर्चात” सहभागी होऊन निष्ठुर सरकारचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले. या मशाल यात्रेत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच उपरोक्त गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.