*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना ग्रिटिंग कार्ड वितरित्..*
भारतीय संस्कृती गुरू आणि शिष्य यांच्यातील नातेसंबंधांना खूप महत्त्व देते. ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन केवळ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करत नाही, तर शिक्षकांच्या समर्पण आणि मेहनतीचाही सन्मान करतो. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या शिक्षकांविषयी त्यांची कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करण्याची संधी मिळते. तर शिक्षकांना आत्मनिरीक्षण करण्याची आणि विद्यार्थ्यांसाठी निरोगी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्याची संधी मिळते. अशाप्रकारे शिक्षक दिनाला अनन्यसाधारण महत्व आहे.आज शिक्षक दिनानिमित्त ओम शिव यांनी वर्गशिक्षक संदिप पुरी सरांना ग्रिटिंग कार्ड भेट दिली.