*बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी गुलाबरावं खरात होणार रुजू…
बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मुंबई येथील गुलाब खरात यांची वर्णी लागली आहे. 2013 च्या आयएएस चे अधिकारी गुलाब खरात शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक पदी होते. अवर मुख्य सचिव वी राधा यांनी एका आदेशान्वये श्री खरात यांना बुलढाण्याच्या सीईओ पदी नियुक्तीचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार? ही प्रतीक्षा गुलाब खरात यांच्या रूपाने संपली आहे. श्री जंगम यांची तीन महिन्यातच त्यांची बदली झाल्याने विविध तर्क वितर्कांना उधाण आले होते. विशेष म्हणजे उभाठा गटाचे नेते जालिंदर बुधवत यांनी जंगम यांच्या बदलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. नवीन सीईओ गुलाब खरात उद्याच प्रभार घेणार असल्याचे समजते…