शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ जळगाव तहसील कार्यालय येथे निवेदन ….!
शेतकऱ्यांच्या मागण्या माण्य करा अन्यथा आक्रमक भुमिका घेऊ :- अक्षय पाटील
जळगाव (जा.) :जिजाऊ जन्मस्थळ मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी दिनांक ४ सप्टेंबर पासुन अन्नत्याग आंदोलन चालु केलेले आहे.
प्रमुख मागण्या.
१) कोणतीही अट न लावता सरसकट पिक विमा मिळाला पाहिजे.
२) सोयाबीन कापसाची दरवाढ झाली पाहिजे.
३) अतिवृष्टीची मदत मिळाली पाहिजे.
४) सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे व आदी काही मागण्या घेऊन त्यांचे उपोषण चालु आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये २०२३-२४ ला अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा काढला परंतु पिक विमा कंपनी व सरकारच्या उदासीन कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांना पिक विम्या पासुन वंचित राहावे लागत आहे. सत्तेतील मंत्री, खासदार,आमदार शेतकऱ्यांना तारीख पे तारीख देत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा पडताना दिसत नसल्याने शेतकरी मात्र हाताने दिसत आहे.तरी कोणतीही अट न लावता शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा देणे महत्त्वाचे आहे.
खरंतर एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या शेतकरी राजाच्या सोयाबीन-कापसाला भाव नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असतांना दिसत आहे. अशा या परिस्थितीमध्ये सोयाबीन कापसाची दरवाढ होणे खूप महत्त्वाची आहे.
या राज्यामध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळुन हजारो शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवल्याचे दिसत आहे कारण सतत नापिकी व बँका नेहमी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना वारंवार त्रास देत असल्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे जगाचा पोशिंदा जगला पाहिजे यासाठी सरकारने ताबडतोब उपाययोजना करून शेतकऱ्याचे सरसकट कर्ज माफ केले पाहिजेत.
तसेच पेरणी पासुन म्हणजेच सव्वा-दोन महिन्याचा कालवधी उलठुन गेल्यानंतरही पाणीच-पाणी चालु असल्याने अनेकांची पिके पाण्यामुळे सडलेली आहेत तर अनेक पिकांना सतत चालु असलेल्या पावसामुळे उत्पन्नात फटका बसत असल्याने शासनाने शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत तात्काळ देणे गरजेचे आहे.आणि इतर काही मागण्या घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आपल्या जीवाची परवा न करता शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग करत आहे.
वरील सर्व मागण्या रास्त असुन शेतकऱ्यांच्या हिताच्या आहे. जर रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला सरकारने जाणुन-बुजुन दुर्लक्ष केल्यास उद्यापासुन आम्ही शेतकऱ्यांचे मुलं रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा तहसीलदार मॅडम जळगाव जामोद यांना युवा आंदोलक अक्षय पाटील व शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला.
यावेळी शिवदास शिरोडकार, तुकाराम गटमने, अजय गिरी, वैभव जाणे, आकाश आटोळे, सदाशिव जाणे, फारुक शेख,अमोल बहादरे, शाम पाटील, प्रमोद तिजारे, सागर गवई, किसना पारस्कार, राजेंद्र राखोंडे, ज्ञानु पाटील, दत्तात्रय पाटील, अवी पाटील तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.