बुलढाणा ब्रेकिंग
*खामगाव येथील पिक विमा कंपनीच्या कार्यालयाला ठोकले कुलूप…*
*स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांची आक्रमक भूमिका…*
अँकर
पिक विमा कंपनीच्या कडून सर्वेसाठी अशिक्षित कामगार पाठवून पिकाचे चुकीचे सर्वे केल्या जात आहे.. हे कामगार शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन नुकसान लिहितात व ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले नाहीत त्यांचं नुकसान लिहीत नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्याचे खरोखर नुकसान होत आहे, अश्या शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळत नाही हा सर्व प्रकार पिक विमा कंपनीच्या चुकीमुळे होत आहे.. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी पिक विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारला व शेतकऱ्यांना हजार बाराशे पंधराशे रुपये कसे येतात यावर संबधित कार्याल्यातील कर्मचाऱ्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली…
पिक विमा कंपनीवर रोष व्यक्त करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सायंकाळी खामगाव येथील पिक विमा कंपनीच्या कर्मचारी सह कार्यालयाला अधिकाऱ्यासह ताला ठोकण्यात आला …. आत मध्ये पीकविमा कंपनीचे कर्मचारी कोंडल्या गेले त्यानंतर पोलिसाना माहिती मिळताच पीकविमा कार्यालय गाठून कार्यालयाचे कुलुप् उघडण्यात आले असून आत कोंडलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका झाली. …